अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना” व “विद्यार्थी विकास विभागाच्या” संयुक्त विद्यमाने “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” दि. 14 ऑगस्ट या दिवशी शासकीय परिपत्रकानुसार “विभाजन विभिषिका स्मृतीदिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी केले, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेऊन स्वातंत्र्यापुर्वी भारताच्या विभाजनाचा प्रस्ताव, विभाजनाची दुर्दैवी घटना, त्याप्रसंगी घडलेला रक्तपात, जातीय व धार्मिक दंगे, त्यात मृत्यू पावलेल्या असंख्य शहीदांची माहिती देत या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व मांडले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून, राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.