अमळनेर:- शहरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत दोन गुन्ह्यात त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
शहरात घरफोडी चोरीसाठी जळगाव, भुसावळ कडुन काही गुन्हेगार अमळनेरला रात्रीच्या पॅसेंजरने येवुन पहाटे चोरी करुन जातात अशी माहीती पो. नि. जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांच्या पथकास रात्रीचे वेळी रेल्वे स्टेशन जवळ फिरणाऱ्या संशयितांवर लक्ष ठेवुन विचारपुस करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वर पथक हे दि. १० ऑगस्ट रोजी रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास शहरात रेल्वे स्टेशन जवळ गस्त घालत असताना त्यांना अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार नामे आकाश अंबर पांचाळ रा. जुने बस स्थानक, अमळनेर हा त्याचा साथीदार नामे शाहरुख ईल्लु पटेल रा. सुप्रीम कॉलनी, जळगांव यांच्यासोबत संशयितरित्या फिरत असतांना आढळून आले. त्यांना सुरुवातीला रात्रीच्या वेळी फिरण्याच्या कारण विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवु लागले म्हणुन त्यांना अधिक चौकशी कामी पोलीस स्टेशनला आणले नंतर विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत शहर भागात घरफोडी चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिल्याने पोलीस स्टेशन कडील दाखल दोन गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळून आला. आकाश पांचाळ हा दिवसभर कुलुप बंद लावलेल्या घरांचे रेकी करुन ती माहीती त्याचा साथीदार शाहरुख ईल्लु पटेल यांस देवुन सदरच्या घरफोडी केली असुन त्यांच्या कडुन नमुद दोन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मालापैकी ११ भार वजनाचे चांदीचे पैजण हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सुचनेप्रमाणे व पो. नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेका चंद्रकांत पाटील, पोना रविंद्र पाटील, पोना कैलास पवार, पोकॉ निलेश मोरे, पोकॉ राहुल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.