बनावट देशी दारुचा मोठा साठा जप्त, दोघांना घेतले ताब्यात…
अमळनेर:- बनावट देशी दारु तयार करुन विकणाऱ्यावर अमळनेर पोलीसांनी कारवाई करत बनावट देशी दारुचा मोठा साठा जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाया करण्याचे आदेश दिले होते. त्यादरम्यान पो.नि. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या बनावट दारु तयार करण्याचा चालता फिरता कारखाना काही इसमांकडुन चालवला जात असुन सदरचे इसम हे तीन ते चार तासात स्पिरीट पासुन बनावट दारु तयार करत असल्याची पक्की खबर मिळाल्याने दि. १९ ऑगस्ट रोजी अमळनेर पोलिसांच्या पथक जानवे शिवारात गेले असता तेथे दोन इसम हे एकूण १,४१,१२० रुपये किमतीच्या २०१६ बनावट दारुच्या बाटल्या व बनावट दारु बनविण्याकरिता लागणारे साहीत्यासह मिळुन आले. व याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम ३२८,३४ दारुबंदी अधि. कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिनेश प्रभाकर भावसार रा. पाटील गढी, भालेराव नगर अमळनेर, शेतमालक भटु वसंत पाटील रा. जानवे ता. अमळनेर यांना अटक केली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोउनि गंभीर शिंदे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जयपाल हिरे, पोउनि गंभीर शिंदे, पोना कैलास शिंदे, पोना हितेश चिंचोरे पोना योगेश महाजन, पोकाँ भुषण पाटील व पोकों सुनिल पाटील यांच्या पथकाने केली आहे.