जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह विविध मान्यवरांची लाभणार उपस्थिती….
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7: 30 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय क्रीडा विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी प्रमुख मान्यवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आमदार अनिलदादा पाटील, जि.प. सदस्या जयश्रीताई पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील. माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी पलांडे, ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. निखिल पाटील, विद्यापीठ सिनेट सदस्य दिनेश नाईक इ. मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून महाविद्यालय क्रीडांगणापासून ते मारवड कळमसरे रस्ता एकूण पाच किमी अंतरासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयातील मारवड, गोवर्धन, डांगरी, सात्री, करणखेडा, मुडी, कळमसरे, वासरे, खेडी येथील सुमारे 500 स्पर्धक सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत प्रथम सहभागी होणाऱ्या 300 स्पर्धकांना टी-शर्ट मोफत देण्यात येणार आहेत. स्पर्धेत प्रथम आलेल्या विजेत्यास 1075 रुपये रोख व ट्रॉफी, द्वितीय विजेत्यास 775 रुपये रोख व ट्रॉफी, तृतीय विजेत्यास 575 रुपये रोख व ट्रॉफी, चतुर्थ विजेत्यास 275 रुपये रोख व ट्रॉफी, पाचव्या विजेत्यास 175 रुपये रोख व ट्रॉफी तसेच पुढील 50 विजेत्या क्रमांकांना उत्तेजनार्थ ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागीतांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजन नियोजनासाठी मारवड पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांमार्फत वाहतूक नियंत्रण, शांतता व सुव्यवस्था, पायलटिंग इत्यादी सेवा व प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या सहाय्याने प्रथमोपचार सुविधा, रुग्णवाहिका इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या आयोजन समितीने केलेले आहे.