अमळनेर:- तालुका जुक्टो संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक पालकर यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
जळगांव जिल्हा जुक्टो संघटना व अमळनेर तालुका जुक्टो संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक महेश पालकर पुणे, शिक्षण अधिकारी बच्छाव, शिक्षण अधिकारी देसले, धुळे, यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सध्या ११ वी व १२ वी कला शाखे कडे विद्यार्थीचा फार कमी प्रमाणात प्रवेश घेत असुन त्या विद्यार्थीच्या जास्त कल सायन्स व कॉमर्स शाखेकडे आहे. तरी शहरी भागासाठी १२० व ग्रामीण भागासाठी ८० ची तुकडी आहे. तरी त्याच्यात आपण सुधारणा करून शहरी भागासाठी ८० व ग्रामीण भागासाठी ६० ची तुकडी करावी. असे न झाल्यास आर्टशाखेतील मोठ्या प्रमाणात प्राध्यापक वृंद हा अतिरिक्त होऊ शकतो. सन २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागु करावी. सातवा वेतन आयोगाच्या थकीत दुसरा व तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात रोखीने मिळावा. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅकेतुन करण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून निवेदन देतेवेळी प्रा. सुनील पाटील, प्रा. स्वप्नील पवार, प्रा. दिनेश बोरसे, उमेश काटे, किरण पाटील, यांसह मान्यवर उपस्थित होते.