अमळनेर:- येथे सानेगुरुजी विद्यालयात 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7 वाजता माजी विद्यार्थी गोविंदा साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचीव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील, सुनील पाटील, अनिता बोरसे, शिक्षक, इतर पदाधिकारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शाळेच्या आवारात साळुंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनतर साळुंके यांनी सध्याची आदिवासी समाजाच्या समस्या, कायदा व योजना अंमलबजावणी ची उदासीनता व आदिवासी विकास विषयी भाषण केले. त्यांनतर संदीप घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणात सध्या आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार व समस्या विषयी मुद्दे मांडले तसेच एनसीसीचे विद्यार्थ्यांनी तिरंगा सायकल रॅली काढली. सानेगुरुजी विद्यालयाने 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा सुंदर उपक्रम सुरू केला आहे. ही माजी विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.