सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीसात दिली फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोने खुर्द येथील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात पन्नास हजार रुपये आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोने खुर्द येथील माहेर असलेल्या अनिता सुनील सोनवणे हीचा विवाह मे २०२१ मध्ये सुजदे ता.जि. जळगाव येथील सुनील जनार्दन सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरचे लोक लग्नात मानपान दिला नाही म्हणून छळ करू लागले. तसेच गहाण ठेवलेली शेती सोडविण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावे याकरिता पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दमबाजी केली. तसेच जानेवारी २०२२ मध्ये विवाहितेला माहेरी सोडण्यासाठी आले असता तेव्हाही वाद घालून शिवीगाळ केली. त्यानतंर विविध प्रतिष्ठित व्यक्तिंमार्फत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आजतागायत ते विवाहितेस घेण्यास आले नाही. त्यामुळे सदर विवाहितेने मारवड पोलीसात पती सुनील सोनवणे, सासरे जनार्दन दोधु सोनवणे, व नंनद शोभाबाई प्रताप सपकाळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून पुढील तपास हे. कॉ. सुनील अगोने हे करीत आहेत.