विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिसांचे वितरण…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय क्रिडा दिनी सोमवार दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7: 30 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय क्रीडा विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील 525 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रारंभी प्रमुख मान्यवर तालुक्याचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील. विशेष न्यायाधीश गुलाबराव पाटील, जिल्हा दूध संघ संचालिका भैरवीताई पलांडे, ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, जि प सदस्या जयश्रीताई पाटील, माजी जि प सदस्या प्रभावतीताई पाटील, माजी जि प सदस्य ऍड. व्ही आर पाटील, माजी जि प सदस्य शांताराम पाटील, खा. शि. संचालक डॉ. अनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, प्रांताधिकारी सीमा अहिरे, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. निखिल पाटील पी एस आय विनोद पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, नगरसेवक शाम पाटील, कृ उ बा माजी सभापती प्रफुल्ल पाटील, पं स उपसभापती भिकेश पाटील, माजी सरपंच अनिल शिसोदे, ग्रा.वि.शि.मं.चे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील, ज्येष्ठ संचालक वाय.के.पाटील, महारू शिसोदे, डॉ.सुरेश साळुंखे, भैय्यासाहेब दिनेश साळुंखे, सुरेश शिंदे, विश्वासराव पाटील, लोटन पाटील, आर.एफ. पाटील, मनोज साळुंखे, चंद्रकांत शिसोदे, नरेंद्र पाटील, करणखेडे येथील महेंद्र पाटील इ. मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेस प्रारंभ झाला. महाविद्यालय क्रीडांगणापासून ते मारवड कळमसरे रस्ता एकूण पाच किमी अंतरासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यात कल्पेश विलास पाटील रा. वसंतनगर तांडा या स्पर्धकाने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवत प्रथम ट्रॉफी व 1075 रू बक्षिस पटकावले. तर द्वितीय क्रमांक शिरसाठ कुंदन माधवराव, तृतीय विजेता मनोज आनंदा पाटील, चौथा क्रमांक पाटील तेजस गोविंदा तर पाचवा क्रमांक पाटील सागर सावकाश याने मिळवला. सर्व विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तर 50 स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व सर्व सहभागीना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी मारवड पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत वाहतूक नियंत्रण, शांतता व सुव्यवस्था, पायलटिंग इत्यादी सेवा व प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या सहाय्याने प्रथमोपचार सुविधा, रुग्णवाहिका इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून सचिन बापुराव पाटील, धनगर सर, प्रीतम सोनवणे, नीलेश साळुंखे, प्रा.सतीश पारधी, प्रा.संजय बागुल, प्रा. संजय पाटील, प्रा.व्ही. डी. पाटील यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ वसंत देसले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संजय महाजन यांनी व आभार प्रा. डॉ पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एल जे चौधरी, मुख्याध्यापक एल एन सैंदाने, मुख्याध्यापक पी ए सोनवणे, सोपान भवरे कळमसरे, प्रा. जितेंद्र माळी, प्रा दिलीप कदम, प्रा माधव वाघमारे, प्रा. नंदा कंधारे, प्रा. विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
मारवड महाविद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण…
मारवड महाविद्यालयात मँरेथाँन स्पर्धेप्रसंगी आलेले मान्यवर मा.आमदार स्मिता वाघ, जि.प.सदस्या जयश्री पाटील, डी.वाय.एस.पी. राकेश जाधव, डाँ. अनिल शिंदे, भैरवी पलांडे, व्ही.आर.पाटील, एपीआय जयेश खलाणे यांच्या हस्ते आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी जयवंतराव पाटील अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळ, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक मंडळ हे कार्यक्रमास उपस्थित होते.