
अमळगावजवळ घडली घटना, निंभोरा गावावर शोककळा…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाचा वादळात अंगावर फांदी पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक १५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर संजय धनगर हा तरुण जळोद कडून निंभोरा येत असताना वादळ सुरू झाल्याने अमळगावच्या अलीकडे देवदत्त किराणा दुकानासमोर चालत्या वाहनावर झाडाची फांदी पडल्याने जबर जखमी झाला. त्यास छाती व पोटास मार लागल्याने तेथील मित्र व नागरिकांनी खाजगी रुग्णालयात व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. समाधान गोरख धनगर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. सुनील अगोने करीत आहेत. प्रगतशील व शिक्षित तरुणाच्या मृत्यूने निंभोरा गावावर शोककळा पसरली आहे.







