लायन्स क्लब व मारवड विकासोने संयुक्तपणे राबवला उपक्रम….
अमळनेर:- लायन्स क्लब अमळनेर व मारवड वि.का.सो. च्या संयुक्त विद्यमाने मारवड येथे जनावरांच्या लंपी या संसर्गजन्य आजाराच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. जवळपास ५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले. मारवड, गोवर्धन व बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाळीव प्राण्यांमध्ये लंपी आजाराची लक्षणे आढळून येत असल्याने मारवड येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ.मुकेश पाटील, सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एस. पाटील, पशुधन पर्यवेक्षक भूषण जोशी, परिचर राहुल बाविस्कर, नाजीम शेख यांनी लसिकरणासाठी सहकार्य केले. तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यावेळी लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी,झोन चेअरमन नीरज अग्रवाल, एमजेएफ विनोद अग्रवाल पंकज मुंदडे,जितू गोहील, राजू नांडा डॉ. मिलिंद नवसारीकर, दिलीप गांधी प्रसन्ना जैन, प्रदीप अग्रवाल,प्रीतम मणियार, येझदी भरुचा, प्रदीप जैन तसेच मारवड वि.का.सो. चेअरमन राकेश मुंदडे, व्हा. चेअरमन गुलाब पाटील, सचिव सुनील पाटील, संचालक शरद पाटील, उमाकांत पाटील, अनिल साहेबराव पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, सुदाम शिंदे, उमेश सुर्वे, पंकज लोहार, आनंदीबाई चौधरी, ताराबाई पाटील, एकनाथ बाविस्कर, कर्मचारी अनिल पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.