जुक्टो संघटनेने निवेदन देत केली आग्रही मागणी…
अमळनेर:- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या असंख्य न्याय्य मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने वेळोवेळी आंदोलने करून शासनाला निवेदने दिलेली आहेत. शासन दरबारी या मागण्या मान्य झालेल्या असूनही अद्यापही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे. या समस्या त्वरीत सोडवण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्यापही काहीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजयजी शिंदे सर यांच्या आदेशानव्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात काळ्या फिती लावून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने रोखीने अनुदान देण्यात यावे. वाढीव पदांना नियुक्ती दिनांक पासून मान्यता व वेतन देण्यात यावे. आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना लागू करावी.1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. आय.टी.विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे. शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात यावे. सीएसचबीवर कार्यरत शिक्षकांचे मानधन वाढवण्यात यावे. विशेष बाब म्हणून कला शाखेतील विद्यार्थी संख्येची अट तात्काळ शिथिल करावी. निवड श्रेणी विना अट सरसकट तात्काळ लावण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर शिक्षक आमदार मा.डॉ.सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष) प्रा. सुनील सोनार (सचिव), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष) प्रा.अतुल इंगळे,प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.जी.एच. वंजारी (उपाध्यक्ष) प्रा.डी.जे.चिकटे (सहसचिव) कार्यकारणी सदस्य प्रा.संदीप पाटील प्रा. मनोज वारके, प्रा. राहुल वराडे, प्रा. राजेश कोष्टी, प्रा. सुधाकर ठाकूर प्रा. शरद पाटील,प्रा. शशीकांत पाटील, प्रा.हितेंद्र पाटील, प्रा.दिनेश बोरसे यासह असंख्य शिक्षक उपस्थित होते.