युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत राबविला उपक्रम…
अमळनेर:- युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत तालुक्यात आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पन्नास व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात प्रमुख व्याख्याते बन्सीलाल भागवत यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भागवत यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीतून अण्णाभाऊ यांनी दिन दलितांच्या व्यथा समाजासमोर मांडून त्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील टिळक व साठे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना इतिहास व थोर पुरुषांबद्दल विविध प्रश्न विचारून उत्तरे देणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण, भटू पाटील, राहुल पाटील हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.