ग्रामपंचायत,विकासो, व दुध डेअरीच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे ग्रामपंचायत व कल्याणी महिला दुध डेअरी व फापोरे विकासो यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांवरील लंपी आजाराचे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सध्या गुरांना संसर्ग जन्य आजार मोठ्या संख्येने होत असून त्यात लंपी हा आजार मोठया प्रमाणात वाढत असून त्यावर वेळेवर प्रतिबंध व्हावा म्हणून फापोरे ग्रामपंचायत, कल्याणी महीला दुध डेअरी आणि विविध कार्यकारी सोसायटी फापोरे यांच्या सहकार्याने दि. १० सप्टेंबर रोजी गावातील ५०० गुरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्यात आले. पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ जानवे येथील डॉ. थोरात व त्यांची टीम तसेच गावातील सरपंच श्रीमती ललीता एकनाथ पाटील, उपसरपंच दिनेश वसंत पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रविण पाटील (राजू फापोरेकर), माजी सरपंच जितेंद्र पाटील, माजी चेअरमन जे. एस. पाटील सर, माजी चेअरमन भालेराव पाटील, माजी सरपंच प्रताप पाटील, दुध डेअरी संचालक सतिष पाटील, विकासो चेअरमन शरद पाटील, शालीग्राम भाऊराव पाटील, हिलाल पाटील, शालिग्राम नवल पाटील, किशोर पांडुरंग पाटील, व्हि .सी . अहिराव सर, ज्ञानेश्वर संतोष पाटील, गोपीचंद श्रीराम पाटील , प्रविण बाबा, माजी सरपंच मयूर पाटील, प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, नरेंद्र पाटील, भिकाजी पाटील, अनिल पाटील, शिवराम गायकवाड, तसेच गणेश पाटील, दिनेश सुभाष पाटील, जिजाबराव पाटील यांनी लसीकरणास सहकार्य केले.