बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाककृतींचे प्रदर्शन…
अमळनेर:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी जळगाव प्रकल्पांतर्गत अमळनेर नागरी विभागात फरशी रोडवरील आंबेडकर भवनातील अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पर्यवेक्षिका श्रीमती विजया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालेभाज्या, कडधान्यांसह विविध सकस आणि पुरक पोषण आहाराच्या केलेल्या पाककृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. पोषण आहाराबाबत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जनजागृती केली जाते आणि सकस आहाराचे महत्त्व 0 वर्षे ते 6 वर्षातील बालकांना, गरोदर माता,स्तनदा माता, किशोरी वयीन मुलींना सांगितले जाते.हे अभियान संपूर्ण देशभरात कुपोषण मुक्त करण्यासाठी राबविले जाते. सदर अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुचिता पाटील, कल्पना येवले, उषा पाटील, सरला चव्हाण, कल्पना पाटील, ज्योती पिंगळे, वंदना पाटील, सुनिता नेतकर, मनिषा चौधरी, अलका चौधरी, प्रतिभा पाटील, ज्योती पाटील यांच्यासह अन्य अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले.