मानधनवाढीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची दिली ग्वाही…
अमळनेर:- दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी मंगलप्रभात लोढा (मंत्री महिला व बालविकास) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला.सदर कॉन्फरन्स मध्ये राज्यासह जळगाव जिल्ह्यातील जळगाव नागरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी, एरंडोल प्रकल्पाच्या प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, पर्यवेक्षिका रत्ना चौधरी,नर्सिग तडवी श्रीमती मुगल यांच्यासह श्रीमती शोभाताई खैरनार (अंगणवाडी सेविका उत्राण गुजर हद्द) श्रीमती वंदना कंखरे (अंगणवाडी सेविका) यांनी सहभाग घेतला. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनवाढीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीत बैठकीमध्ये महागाईचा विचार करून अन्य राज्यांच्या धर्तीवर आमच्या मानधनातही वाढ करावी अशी आग्रही मागणी केली. मिळत असलेल्या अल्प मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रपंच चालविणे साठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.अशीही मागणी सहभागी अंगणवाडी सेविकांनी मा.मंत्री महोदयांसमोर केली. मा.मंत्री महोदयांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी अंगणवाडी सेविकांना दिले. सदर मीटिंगमध्ये श्रीमती आय.ए.कुंदन(सचिव महिला व बालविकास), श्रीमती रुबल अग्रवाल (आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना,नवी मुंबई) वि.रा.ठाकूर उपसचिव, खान अवर सचिव, उपायुक्त मस्के, कक्ष अधिकारी जाधव यांनी सहभाग घेतला होता तर अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी शोभाताई खैरनार यांनी सहभाग घेतला.शोभाताई खैरनार यांना संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.