उत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात केला सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील 20 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्यात प्रथम-हर्षला विनायक पाटील(10 वी), द्वितीय-भाग्यश्री सतीश पाटील(9 वी), तृतीय-भाग्यश्री महेंद्र पाटील(10 वी), उत्तेजनार्थ-श्वेता गौतम बैसाणे(9 वी), संजना शिवाजी पाटील(10 वी) वरील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा प्रमुख आय.आर.महाजन यांच्याकडून बक्षिसे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. सर्वसामान्यांना सुद्धा सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. यासाठी हा दिन साजरा केला जातो नागरिकांना शासन दरबारी नेमकं काय चाललंय हे समजून घेण्याचा अधिकार माहितीचा अधिकार मिळालेला आहे. त्याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे हेतूने 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले कि माहितीचे अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात सन 2005 पासून लागू झाल्यापासून देशातील व राज्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात अंकुश बसत आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे व इतर शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला वाव राहू नये यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झाली. परंतु या कायद्याचा प्रचार व प्रसार व्यापक होण्याची गरज आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्यानसारखे उपक्रम राबविले तर कायद्याचा प्रचार व प्रसार होईल व विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराबाबत माहिती होईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ. माळी, अरविंद सोनटक्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन यांनी केले.तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.