महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा पाठपुरावा…
अमळनेर:- राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दिली जाणारी भाऊबीज भेटीच्या रकमेमध्ये वाढ करून ती दिवाळीपूर्वी देण्यात यावी यासाठी संघटनेच्या माध्यमातून सततपणे शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.त्या अनुषंगाने राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दरवर्षाप्रमाणे यंदाही प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने ३७ कोटी ८५ लाख ५४ हजार इतक्या निधीची तरतूदीचा शासनाने निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार महीला व बालविकास विभागाचे सचिव जहांगिर खान यांच्या स्वाक्षरीने दि.४ ऑक्टोंबर २०२२ रोजी शासकीय आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्या संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश आले आहे म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी न्याय्य व हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेला आणखीनच भक्कम करावे तसेच सभासद वाढवून ताकद वाढवावी आणि कोणाच्याही भुलथापांना तसेच गैरसमज पसरविण्यांना बळी पडू नये असे आवाहन संघटनेतर्फे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.