
जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावर मारली मजल…
अमळनेर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव यांनी आयोजीत केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुलच्या विद्यार्थ्यांनी योगा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
जळगाव येथे झालेल्या योगा स्पर्धेत जिल्हयातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ग्लोबल स्कुलच्या १४ व १७ वर्षाखालील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावर मजल मारली आहे. यात मुलींच्या गटात इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी रूचिका पाटील, हर्षिता साळुंखे व दिक्षा संदानशिव तसेच मुलांच्या गटात इयत्ता १० वी चा विद्यार्थी सुयश जैन हे विद्यार्थी जिल्हास्तरावर विजयी होवुन सदर विद्यार्थ्यांनी विभागीय स्तर गाठले. सदर स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका पायल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन छायाभाभी मुंदडा , सहसचिव योगश मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर दिपीका मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी शाळेचे प्राचार्य लक्ष्मण, प्रायमरी प्राचार्या विद्या मॅडम, प्रि – प्रायमरी को – ऑडीनेटर योजना ठक्कर, सर्व शिक्षिक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर विद्यार्थी व शिक्षिका यांचे कौतुक केले आहे.




