
त्वरित रस्ता मोकळा करण्याची निवेदनाद्वारे मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे प्र.जि.मा. 49 या रस्त्यावर रस्तालगत मोठया प्रमाणावर मोठे झाडे, काटेरी झुडपे आणि वळणावर असलेले झाडे व पावसाळयातील गवत खुप प्रमाणात वाढल्याने भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, या झुडपामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गावातील नागरीकांना शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे, समोरुन येणारी वाहने या झुडपामुळे दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तसेच अनेक किरकोळ अपघात देखील झालेले आहेत. तरी मागणीची दखल घेवून तात्काळ रस्त्यालगतची झाडे-झुडपे काढुन नागरीकांचे येणे-जाण्यासाठी रस्ता मोकळा करावा अशी विनंती शिवाजी राजपूत यांनी केली आहे. सदर निवेदन श्री. महाजन यांना देण्यात आले. निवेदनावर शिवाजी राजपुत, विनोद पाटील, मनोहर पाटील,राहुल पाटील, मच्छीन्द्र पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.