विनाअनुदानित शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- येथील एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक समन्वय संघ,अमळनेर तालुक्याचा संवाद मेळावा दि. ८ रोजी संपन्न झाला.
व्यासपीठावर मुख्याध्यापक धनराज महाजन सर, विंचूरकर सर, मुकेश अहिरे सर व जुनियर कॉलेजचे (विनाअनुदानित संघटना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख) योगेश चौधरी सर उपस्थित होते. यावेळी प्रदिप चौधरी यांनी कार्यक्रमाचा विषय नमूद करत प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व विनाअनुदानित शाळेचे शिक्षक बांधव व श्री एन.टी.मुंदडा विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सी.एस.पवार,हर्षल पाटील, एस.एच.पवार, दिपक पाटील, बी. बी. पाटील व आदी शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज महाजन सर यांनी ज्वलंत असलेल्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पी.एन.मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विंचुरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात डी.एन पाटील सर यांनी विनाअनुदानित बांधवांच्या व्यथाबद्दल मत मांडत धरणे आंदोलन साठी पाठींबा दर्शविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक अनिल माळी तर आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. प्रसंगी अमळनेर मधून जास्तीत जास्त शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनासाठी रवाना होतील व आजाद मैदान गाठतील असा सर्वानुमते निर्धार करण्यात आला.