भव्य स्मारकाचे उदघाटन करत महाप्रसादाचे केले वाटप…
अमळनेर:- रामायणाचे रचेते आद्य कवि महर्षी वाल्मिक जयंती उत्सव निमित्त काल दिनांक ९ रोजी तालुक्यातील पाडळसरे गावात महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाने उभारलेल्या भव्य स्मारकाचे उदघाटन करून सजविण्यात आलेल्या स्मारकाची संदीप कोळी व विजय कोळी, बंटी कोळी यांचे हस्ते सायंकाळी प्रतिमा पुजन व माल्यार्पन करण्यात आले.
यावेळेस जयसिंग कोळी, गंगाराम कोळी , कैलास कोळी ,रामसिंग कोळी , भास्कर कोळी ,संजय कोळी ,माजी उपसरपंच अभिमन कोळी , कोळी महासंघाचे सुखदेव कोळी, हिंमत कोळी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन यशवंत कोळी ,विश्वास कोळी, शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, नाना कोळी,चंपालाल पाटील , कैलास कोळी, शांताराम पाटील,कृष्णा कोळी, पुंडलिक कोळी , महारु कोळी ,नत्थु कोळी ,सुखदेव कोळी ,सचिन कोळी ,अप्पा कोळी ,राहुल,माजी उपसरपंच रवींद्र पाटील, कोळी, राजेंद्र पाटील, पोलीस पाटील उमाकांत पाटील, माजी सरपंच सचिन पाटील , रमेश पाटील, संजय पाटील ,रणछोड पाटील, भूषण पाटील ,काशिनाथ पाटील,शत्रूघन पाटील आदी मान्यवरांचे हस्ते पूजन करून फुले वाहिलीत, व महर्षी वाल्मिक यांची आरती व निरंकारी मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. नविन पुनर्वसीत पाडळसरेत व जून्या गावात सजवलेल्या ट्रॅक्टर वरून भव्य मिरवणूक काढण्यात आली घराघरातुन आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला व भव्य प्रतिमेची ढोल ताश्यांचे गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस घराघरातून महर्षी वाल्मिक प्रतिमेची आरती झाली. महर्षी वाल्मिक मित्र मंडळाकडून आयोजन भंडार्यात प्रसाद वाटत करण्यात आला असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम व मिरवणूक यशस्वीतेसाठी सागर कोळी, राजेंद्र पाटील, जगदीश भदाने, गौरवकुमार पाटील, राहुल कोळी, भावड्या कोळी, रावसाहेब कोळी, आप्पा कोळी, पुंडलिक कोळी बापू अहिरे आदींसह महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व कोळी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला .