विविध प्रलंबित मागण्यांकडे वेधनार शासनाचे लक्ष…
अमळनेर:- विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत,मा.मंत्री महिला व बालविकास यांनी सांगितल्या प्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा निर्णय दिवाळीपूर्वी घ्यावा, सेवानिवृत्तीनंतरचा थकीत एकरकमी लाभाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे,पोषण ट्रॅकरची भाषा मराठी करावी, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी अर्थ संकल्पात केलेल्या तरतुदीनुसार नवीन अद्यावत मोबाईल पुरविण्यात यावे, भाऊबीज भेटीची रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात,मिनी अंगणवाडी केंद्र नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतरित कराव्यात,नागरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे सुधारित घरभाडे लागू करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लागू करावी. यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१४ ऑक्टोंबर २०२२ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींचे लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तरी दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान मुंबई येथे १०० टक्के उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन मायाताई परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण बी.पाटील, सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे,दत्ता जगताप यांनी केले आहे