हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कार…
अमळनेर:- विश्वरूद्र फाउंडेशन संचलित माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सरस्वती माध्यमिक विद्यालय सडावन तालुका अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षक निवृत्ती लक्ष्मण पाटील यांना सन्मानित करण्यात आले होते. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी हिंदी अध्यापक मंडळाचे अमळनेर तालुका अध्यक्ष आशिष शिंदे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील,कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिध्दीप्रमुख ईश्वर महाजन यांच्या हस्ते निवृत्ती पाटील यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024