अमळनेर :- दीड लाखाची लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धरलेल्या दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहर तलाठी गणेश महाजन व मंडल अधिकारी दिनेश सोनवणे यांना जिल्हा वर्ग १ न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास करायचं असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायाधीश गायधनी यांनी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.