राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान…
अमळनेर:- गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल धुळ्याचे पोलीस अधीक्षक व तालुक्याचे सुपुत्र प्रवीणकुमार पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ आनंद लिमये, पोलीस दलाचे महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. ते तालुक्यातील कावपिंप्री येथील रहिवासी असून त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात झाले आहे. याआधी मुंबई उपविभागीय पोलिस अधीक्षक व विधान भवन डीसिपी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. दिनांक १३ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.