
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील २७ वर्षीय तरुणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याची घटना काल घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धार येथील तरुण विजय नाना पाटील हा सेल्वासा येथे कंपनीत कामाला होता. दसऱ्यापासून तो गावी आला होता. काल दिनांक १५ रोजी ५ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यास उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रविंद्र पाटील याच्या खबरिवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.







