आरोपींची दंगलग्रस्त भागात काढण्यात आली धिंड…
अमळनेर:- येथील दंगलप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली असून काल दंगलग्रस्त भागात आरोपीची धिंड काढण्यात आली
याप्रकरणी आतापर्यंत रियाज कलिम बागवान (वय २४ वर्षे रा. अंदरपुरा), आबीदखा मोहम्मदखा पठाण (वय ३६ रा. कसाली मोहल्ला), नफिसखा सलीमखा पठाण (वय.२४ रा.कसाली मोहल्ला), सैय्यद मोसीन अली मुबारक अली (वय २५ रा. अंदरपुरा) शोयबखान अत्तरखा पठाण (वय २१ रा. अंदरपुरा), अरबाजखा युसुफखॉ पठाण (वय.२३ रा. अंदरपुरा), विशाल दशरत चौधरी (वय २७ वर्षे रा. भोईवाडा) मनोज बबन ठाकरे (वय २५ वर्षे रा.झामी चौक), दिपक काशीनाथ महाजन (पाटील) (वय. ३३ वर्षे रा. आमलेश्वर नगर), महेश मधुकर चौधरी (वय 28 वर्षे. शिरपूर शिरपूर जि.धुळ ह.मु. झामी चौक), अजय ऊर्फ दामोधर दत्तु नाथबुवा (वय २४ वर्षे रा. गोहील नगर), धनजंय वंसत पाटील (वय २४ वर्षे रा. आमलेश्वर नगर), यशवंत शांताराम शिंगाणे (वय २८ वर्षे रा. आमलेश्वर नगर), नावीद अहमद नसुरोद्दीन (वय ३२ रा.फरशीरोड), कमालोद्दीन एजाजोद्दीन (वय ३१ रा.अंदरपुरा) या हिंदू मुस्लीम एकुण १५ आरोपी अटक केली आहे. या सर्वांना घटनास्थळी घेवून जात हिंदू मुस्लिम अशी जोडी बनवून जोडीने फिरवण्यात आले. समाजात कायद्याचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत संदेश देण्याचा प्रयत्न अमळनेर पोलिसांनी यावेळी केला आहे.