
तालुकाध्यक्षपदी मयूर पाटील, कार्याध्यक्षपदी आशिष शिंदे नियुक्त…
अमळनेर:- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक संघटनेची अमळनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.

यावेळी जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष मयूर पाटील (झाडी), कार्याध्यक्ष आशिष शिंदे (पिळोदा), उपाध्यक्ष अमित पवार (पातोंडा), उपाध्यक्ष विनोद सोनवणे (शिरुड), उपाध्यक्ष देवेंद्र साळुंखे (मारवड), उपाध्यक्ष किशोर सुर्यवंशी (आर्डी), संघटक राहुल पाटील (तासखेडा), सल्लागार अमित पाटील (मांडळ), सचिव विलास सुर्यवंशी (मुडी प्र.डां), संपर्क प्रमुख योगेश पवार (तळवाडे), सरचिटणीस निलेश पाटील (अमळगाव), सरचिटणीस विशाल पाटील (जानवे), सोशल मीडिया प्रमुख मच्छिंद्र वाघ (पातोंडा) आदींचा समावेश असून तालुका समन्वयक पदी खालील आठ नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यात सुधीर पाटील (एकलहरे), गोरख पाटील (दहिवद खु), सचिन पाटील (ढेकूसीम), दिपक पाटील (मंगरूळ), विकास नेरकर (कन्हेरे), रोहित पाटील (जवखेडा), किरण पाटील (आमोदे), महेश पाटील (गांधली) यांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांनी आपल्या मनोगतात मराठा समाजाला संघटीत करून नव्या जोमाने कार्य करावे व एक नवी दिशा आपण निर्माण करून मराठा समाजाचे विविध प्रश्नांवर आपल्या परीने आवाज उठवावा असे सांगितले, यावेळी तालुकाध्यक्ष मयुर पाटील, तालुका कार्याध्यक्ष आशिष शिंदे व तालुका उपाध्यक्ष अमित पवार मनोगत व्यक्त केले, यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ समाज बांधव दिलीप बिरारी, हिंमतराव पाटील, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अ.भा.मराठा युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पवार सर (गांधली) यांनी तर सूत्रसंचालन अ.भा.मराठा युवक सोशल मीडिया जळगांव जिल्हाध्यक्ष गणेश भामरे (बाम्हणे), आभार संघटक राहुल पाटील (तासखेडा) यांनी मानले.







