मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहायला नको :- प्रा. सुभाष पाटील…
अमळनेर:- तालुक्यातील सप्टेंबर १९ मधील ४० गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत बहुसंख्य शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार होते असल्याचे समोर आले असून या शेतकऱ्याकडून रोष व्यक्त होत आहे.
गेल्या तीन वर्षापासून हे शेतकरी मदतीपासून वंचित असून सरकार बदलल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या १७ हजार शेतकऱ्यासाठी 35 कोटी 31 लाख 79 हजार रक्कम मंजूर करण्यात आली. सुमारे १३ हेक्टर क्षेत्रासाठी ही मदत असून शासन निर्णयाचा चुकीचा अन्वयार्थ काढून तहसीलदारांनी चुकीचा आदेश दिल्याने फक्त बिगर कर्जदार आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादा ग्राह्य धरून २०४०० मदत देण्यात येत आहे. मात्र यात बऱ्याच रेगुलर कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार समोर येत असून हे चुकीचे असल्याचे किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी प्रा. सुभाष पाटील यांनी सांगितले की, १३ हजार हेक्टर साठी ही मदत आली असून प्रति हेक्टर 27 हजार रक्कम देण्यात येऊ शकते. तहसीलदारांच्या चुकीच्या तोंडी आदेशामुळे फक्त १ हजार ते १२०० शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि उर्वरित रक्कम शासनाकडे परत जाणार आहे. बहुसंख्य शेतकरी मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर या मदतीपासून वंचित राहणार आहे. सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून त्याबाबतचे पत्र आपण तहसीलदारांना दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, सप्टेंबर 2019 मधील बाधीत गावातील शेतकऱ्याला पैसे मिळतील. कोणत्याही कारणाने एकही शेतकरी सुटू शकत नाही जर कोणी यादी करतांना शेतकऱ्याला वंचित ठेवत असेल तर त्याला संबंधित कर्मचारी जबाबदार राहील. त्यामुळे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करावी असे सांगितले आहे.