रब्बी हंगामात बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन…
अमळनेर:- कृषी विभागातर्फे बीज प्रक्रिया संयंत्राचे तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
दि. १७ ऑक्टोबर रोजी तालुका कृषि कार्यालयात पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प खरिप हंगाम 2022-23 अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या बीज प्रक्रिया संयंत्राचे वितरण जिल्हा परिषद व आत्मा सदस्या जयश्री अनिल पाटील, आत्मा अध्यक्ष सुनिल पवार व उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधवर यांच्या शुभहस्ते सहा लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यावेळी तालुका कृषि अधिकारी भरत वारे, मंडळ कृषि अधिकारी अविनाश खैरनार, मयूर कचरे कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, आत्मा व लाभार्थी मातोश्री इंदूताई ऍग्रो फार्मर्स प्रो. कंपनी, टाकरखेडा,जय किसान इरीगेशन, लोण,श्री. केदारसिंग कोमलसिंग जाधव, हिंगोणे बु, श्रीपाद ऍग्रो एजन्सीज, अमळनेर, ज्ञानेश्वर एकनाथ पाटील, मंगरूळ व भूमिपुत्र शेतकरी बचत गट प्र. डांगरी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते ज्वारी 100% अनुदानावर फुले रेवतीचे लाभार्थी यांना वाटप करण्यात आले. जयश्रीताई पाटील यांनी सदर बीज प्रक्रिया सयंत्र तालुक्यातील इतर सर्व शेतकऱ्यांना चालू रब्बी हंगामात बिजप्रक्रियेसाठी माफक दरात उपलब्ध करून 100% बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.