नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषी विभागातच आत्मदहन करण्याचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील शेतकऱ्याने सूर्यफूल बियाणे कंपनीने फसवणूक केली असल्याची तक्रार दिल्यानंतर कारवाई होत नसल्याने कृषी विभागाच्या कार्यालयातच आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डांगरी येथील शेतकरी उदय अर्जुन शिसोदे यांनी त्यांचा मुलाच्या नावावर (प्रमोद उदय शिसोदे) असलेले डांगरी शिवारातील गट नंबर ६५ मध्ये ०.४५ आर क्षेत्रावर गंगा कावेरी सिड्स कंपनी हैद्राबाद यांचे जी के -२००२ हे सूर्यफूलाचे वाण दिनांक १ ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील कृषी केंद्रावरून खरेदी केले होते. त्याची पेरणी दिनांक ३ ऑक्टोबर रोजी उदय शिसोदे यांनी केली. परंतु सूर्यफूल पिकाची शेतात उगवणच झाली नाही म्हणून शेतकऱ्याने कंपनी बियाणे विक्रेत्याकडे तक्रार केली परंतु विक्रेत्याने त्यांना फक्त समजूत घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून उदय शिसोदे यांनी अमळनेर कृषी कार्यालयात देखील दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार केली परंतु कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांची आजवर काहीही दखल घेतलेली नाही म्हणून अमळनेर तालुका कृषी अधिकारी ,कृषी विभाग अमळनेर यांना स्मरण पत्र लिहीले असून त्यात त्यांनी लिहले आहे की माझे शेत १ ऑक्टोबर पासून ज्या परिस्थितीत आहे तसेच आजवर आहे. माझी तक्रारिचा निकाल लागेपर्यंत मी त्यात काहीच पेरणी करणार नाही सूर्यफूल लागवड करून त्याची उगवण न झाल्याने सदर प्रकरात साधारण ७० ते ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.मी गरीब परिस्थितीचा अल्पभूदारक – कर्जबाजारी शेतकरी आहे व नुकसान सहन करण्याची माझी क्षमता नाही मला नुकसान भरपाई न मिळाल्यास मी आपल्या कार्यलसमोर आत्मदहन करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घेणार आहे.तसेच अर्जासोबत बियाणे बिलाची पावती ही जोडली आहे असे उदय शिसोदे यांनी म्हटले आहे.