बुरहानी गार्डस् इंटरनॅशनल व अमळनेर रोटरी क्लबचे दातृत्व…
अमळनेर:- १६ ऑक्टोंबर २२ जागतिक आहार दिनानिमित्त पब्लिक रिलेशन कमिटी दाऊदी बोहरा समाज, बुरहानी गार्ड्स अमळनेर व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 152 अन्नाचे पाकिटांचे व लाडूंचे वितरण गरजूंना रुपजी बाबा नगरात करण्यात आले.
याप्रसंगी दाऊदी बोहरी समाजाचे आमिल साहेब शेख नुरुद्दीन जमाली, शेख मोहम्मदभाई करमपुरवाला, मुल्ला अब्बास भाई, रोटे.अहमद बुरहांनी, कॅप्टन ताहा बुकवाला, व्हाईस कॅप्टन अजीज बोहरी, शब्बीर साकी, हुसेन बोहरी व शब्बीर हुसेन,अली अजगर अलाबक्ष व रोटरी क्लबचे अध्यक्ष रो कीर्तिकुमार कोठारी व रोटरी सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केल्याचे पीरओ मकसूद बोहरी यांनी सांगितले.