तालुक्यात आतापर्यंत १६ जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव…
अमळनेर:- तालुक्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराने पाय पसरायला सुरुवात केली असून निम येथे शेतकरी नारायण भिवसन क्षीरसागर यांचा धडधाकट बैल लम्पिच्या व्याधीने ग्रस्त होऊन दोन दिवस पूर्वी लक्षणे दिसून आल्याने उपचारादरम्यान दगावला असून लोण खुर्द येथे ही शेतकरी गुलाबशहा हसनशहा फकीर यांची दुभती गिर जातीची गाय दोनच दिवसात लॅम्पिच्या गाठी फुटून दगावल्याने पशुपालक वर्गाने धास्ती घेतली असून लस घेऊनही लम्पिग्रस्त जनावरे दगावल्याने पशुपालकांत भीती निर्माण झाली आहे.
तालुक्यात लम्पिचा प्रादुर्भाव जनावरांना दिसून येत असून लक्षणे फक्त दोन तीन दिवस आधीच दिसतात व शरीरावर गाठी तयार होऊन त्या फुटून एक दोन दिवसात पशुधन दगावत असल्याचे शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. तालुक्यात सामाजिक संस्था व लायन्स क्लब कडून ग्रामीण सह शहरी भागातील पशुधनाची काळजी म्हणून आधीच लसीकरण सुरू आहे तरीही लम्पि पाय पसरत असून आतापर्यंत १६ जनावरांना लम्पिचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ पी यु कोरे सांगितले , ऐन वसुबारसच्या दिवशी लोण येथे गाय दगावली व सायंकाळी निम येथे बैल दगावला सणासुदीला पशुपालक शेतकरी वर्गाचे पशुधन दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे तर भीतीही घेऊन शेतकरी आपली जनावरे सामूहिक पाणवठ्यावर न नेता घरी किंवा शेतातच चारा पाणी घालताना दिसत आहेत, तरी पशुवैद्यकीय विभागाने ग्रामीण भागात पशुधनावर लम्पिचा प्रादुर्भावचा फैलाव होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करून लम्पिने पशुधन मृत होण्यापासून वाचवावे व शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी पशुपालक वर्गातून होत आहे.