
फापोरे बु. येथील तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरटा झाला जेरबंद…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु. येथील तरुणांच्या सतर्कतेमुळे आनंद बालरुग्णालयाचे डॉक्टर कमलेश पाटील यांची हॉस्पिटल समोरून चोरीला गेलेली दुचाकी मिळाली असून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फापोरे गावात रात्री उशीरा एक परप्रांतीय इसम टिव्हीएस ज्युपीटर गाडीवर आढळून आला तर त्याला थांबवून गावातील तरुणांनी त्यांची चौकशी केली असता सदर गाडी या इसमाने चोरून आणल्याचे लक्षात आल्याने त्याला धरून ठेवत पोलीस स्टेशनला फोन करून माहीती देण्यात आली. तेवढ्यात काही लोकाच्या लक्षात आले की, ही गाडी डॉ. कमलेश पाटील अमळनेर यांची आहे. सदर माहीती त्यांना फोनवर सांगीतली व फापोरे येथे येवून ती गाडी घेऊन जा असे सांगितले. व पोलीस देखील घटना स्थळी दाखल होऊन सदर इसमास पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तरी यावेळी फापोऱ्याचे उपसरपंच दिनेश पाटील व अजय पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील, सोमनाथ गायकवाड, प्रा. सुरेश पाटील, किशोर पाटील, वैभव पाटील, प्रगत पाटील, भिमराव पाटील, रविंद्र पाटील, नुतन बिर्हाडे तसेच गावातील तरुण वर्गाचे कौतुक केले जात आहे.







