पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची राहणार उपस्थिती…
अमळनेर:- येथे बाळासाहेबांची शिवसेना अमळनेर तालुका कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना वाढीसाठी प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे शाखा आणि शहर तिथे कार्यालय स्थापन करून उद्घाटने होत आहेत. सोमवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजता भागवत रोड खड्डाजीन अमळनेर येथे कार्यालय स्थापन केले असून त्या कार्यालयाचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, सुंदरपट्टी सरपंच सुरेश अर्जुन पाटील, महेश देशमुख, रत्नमाला साखरलाल महाजन, गुणवंत पाटील यांनी केले आहे.