प्रहार संघटनेकडून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा…
अमळनेर:- स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन निर्णयाचे अमळनेर प्रहार संघटनेकडून स्वागत करण्यात आले असून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी गेली २० ते २५ वर्षांपासून केलेली मागणीबाबत दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भुसे, बच्चू कडू व प्रहार संघटनेचे कार्यकारणी सोबत झालेल्या बैठकीत दिव्यांगांच्या विषयावर चर्चा करून भारतातील पाहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन करून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना लाभ होणार असून या निर्णयाची अधिकृत घोषणा दि. ३ डिसेंबर २०२२ जागतिक अपंग दिनी होणार असल्याने निश्चित झाल्याने या निर्णयाचे स्वागत म्हणून अमळनेर शहरात प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने ढोल ताश्यांच्या गजरात, फटाके फोडून , पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, प्रदिप सोनवणे, रविंद्र पाटील, दिनेश पाटील, भैय्या पाटील, नूरखान पठाण, प्रविण पाटील, ललिता पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, रंजू जैन, योगेश पाटील, हेमंत महाजन, हरिप्रसाद कापडे, अशोक न्हावी, अश्विनी पाटील, श्याम धनगर, संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.