देवगांव देवळी येथे वकृत्व स्पर्धा तर टाऊन हॉल येथे प्रतिमा पूजन…
अमळनेर:- संविधानाविषयी जनजागृती व्हावी, संविधानाविषयी नागरिकांमध्ये आदर निर्माण व्हावा, आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव नागरिकांमध्ये दृढ व्हावी यासाठी २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जातो. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांना समता स्वतंत्र आणि बंधुतेची शिकवण देते असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये संविधान दिनानिमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विचारपिठावर शाळेचे ज्येष्ठ क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के, सांस्कृतीक विभाग प्रमुख आय. आर. महाजन, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ. माळी, लिपिक एन.जी देशमुख होते.
इयत्ता नववीतील आकांक्षा जाधव, वैष्णवी माळी, श्वेता बैसाणे, जयश्री पाटील, भाग्यश्री पाटील, गायत्री भील तर इयत्ता दहावीतील भाग्यश्री पाटील, ईश्वर वसावे, हर्षल पवार, धम्मदीप सपकाळे, तेजस पाटील, भाग्यश्री पाटील ,संजना पाटील ,स्नेहल पाटील यांनी संविधानाविषयी आपले मनोगत व कविता व गाणे सादर केले. पहिल्या चार विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिली जाणार आहेत. शिक्षक एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून एच.ओ. माळी यांनी काम पाहिले.शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एच. ओ. माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आय आर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी केले.
साने गुरुजी वाचनालयात संविधान दिवस साजरा…
संविधान निर्माते घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत संविधान दिवस व समता पर्वानिमित्त सर्व कार्यकारिणी यांनी पू साने गुरुजी ग्रंथालयात हा दिवस साजरा केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले तर यावेळी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर, संचालक अँड उपासनी, जेष्ठ संचालक भिमराव जाधव सर, प्रसाद जोशी, वाचक अमोल धाडकर व कर्मचारी हजर होते.