दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतली अध्यापनाची अनुभूती…
अमळनेर:- बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनीच नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. असे म्हणत सत्यशोधक समाज निर्मितसाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले. अशा या क्रांतिसूर्य जोतिराव फुलेंचा स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतिराव फुले हायस्कूल मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. त्यात शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका करत अध्यापन केले.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी हर्षला पाटील मुख्याध्यापक, शिक्षकाच्या भूमिकेत स्नेहल पाटील, भाग्यश्री पाटील, तेजस पाटील, गायत्री पाटील, ईश्वर वसावे, राजश्री पाटील, आकांक्षा माळी,प्रणाली महाजन व शिक्षकेत्तर कर्मचारी पवन पाटील, लोकेश महाजन यांनी दिवसभर काम अत्यंत शिस्तबद्ध शाळेचे कामकाज पाहिले. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय.आर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे नियोजन केले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी हर्षला पाटील मुख्याध्यापक म्हणून मार्गदर्शन करत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत व दिवसभरात आलेले अनुभव कथन केले. यावेळी विद्यार्थी सह विद्यार्थी शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील राजश्री पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा माळी यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन, एच.ओ. माळी, अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024