चेन्नई येथे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देवून केला सन्मान…
अमळनेर:- अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत गांधली येथील मोक्षदा महाजन हिने नेत्रदीपक यश मिळवत तालुक्याचे नाव उंचावले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय कनवेशन सेंटर मध्ये एसआयपी अबॅकसची राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. देशातून ५००० पेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी यात सहभागी झाले होते. अमळनेरच्या ब्रिलिनसी डेव्हलपमेंट सेंटरची विद्यार्थिनी कु मोक्षदा हिची या स्पर्धेसाठी निवड निश्चित करण्यात आली. अतिशय कठीण बेंचमार्क पूर्ण करून तिच्या गटात ती पहिल्या 5 मध्ये आली. तिने 11 मिनिटांच्या स्पर्धेत 200 पेक्षा अधिक अंकगणितीय समीकरण अचूक सोडवली. एसआयपी अबॅकसचे राष्ट्रीय प्रमुख दिनेश व्हिक्टर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन चेन्नई येथील कार्यक्रमात तिचा गौरव करण्यात आला. कु मोक्षदा ही अमळनेर च्या सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल ची इयत्ता 8 वी ची विद्यार्थीनी असून तिला एसआयपी अबॅकसच्या संचालिका स्नेहा रोडगे पाटील, कविता शिंपी, शीतल पाटील, धारिणी पाटील, पूजा सुरसुरे आणि दर्शन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले तिचा या यशात आई राजश्री किरण महाजन आणि वडील किरण दोधु महाजन यांच्या मार्गदर्शनाचा ही मोठा वाटा आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024