लवजिहादच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार…
निवेदन देत श्रद्धाच्या मारेकऱ्यास मृत्युदंडाची केली मागणी…
अमळनेर:- शहरात काल हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणावर अमळनेरकर सहभागी झाले. यावेळी तरुण तरुणींची संख्या लक्षवेधी होती.
शहरातील पाचपावली मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद केले आहे की, श्रद्धाची हत्या ही सुनियोजित षडयंत्र असून अनेक तरुणींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आयुष्य नासवले जात आहे. सदर आरोपीला भरचौकात फाशी देवून जरब बसवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, तरुणी तसेच महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली.