व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हा सचिव सचिन पाटील यांचा सत्कार…
अमळनेर:- पारनेर तालुका अहमदनगर येथे दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी आयोजित डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीत जळगाव जिल्हा तृतीय विजेता ठरला.
असोसिएशनचे राज्य अध्यक्ष आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुंबई प्रथम क्रमांक तर पुणे जिल्हा द्वितीय आणि जळगाव जिल्हा तृतीय विजेता ठरला. तर आयोजक नगर जिल्ह्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जळगाव संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून नूर सर तर संघ प्रशिक्षक म्हणून गुल मोहम्मद सर यांनी काम पाहिले तर डॉ. वसीम, अतिक, जुबेर इत्यादी स्पर्धक संघात सहभागी झाले होते. सर्व यशस्वीतांचे जळगाव जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे सचिव सचिन बापूराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पोलीस उपअधीक्षक रायसिंगे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी आ. निलेश लंके यांनी जळगांव जिल्हा संघाच्या कामगिरीबद्दल प्रशंसा करून जळगांव जिल्हा सचिव सचिन पाटील यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024