पाच हजार घेताना वरिष्ठ तंत्रज्ञास रंगेहाथ धरले…
अमळनेर:- शहरातील क्रांती नगर भागातील विज मीटर बदलण्यासाठी दहा हजाराची मागणी करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञास पाच हजार घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील क्रांती नगर भागातील तक्रारदाराचे मीटर बंद पडले असल्याने अभियंता देशमुख हे पाहणी करून गेले होते. त्यानतंर अभियंता देशमुख याच्या सांगण्यावरून तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तक्रारदाराच्या घरी येवून १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ५ डिसेंबर रोजी तक्रारदाराच्या घरी तंत्रज्ञ भरत पाटील यांना पाच हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे विभागाचे उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली.