
किसान युवा क्रांती संघटनेकडून होणार शेतकर्यांचा गौरव…
अमळनेर:- राष्ट्रीय किसान दिनी किसान युवा क्रांती संघटनेकडून शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
भारताचे दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा “राष्ट्रीय किसान दिवस” म्हणून साजरा केला जातो. देशाचा शेतकरी हा भारताचा अभिमान आहे. या बळीराजाला गौरविण्यासाठी “कृषिरत्न पुरस्कार” देवून त्यास सन्मानित करण्यात येणार आहे. किसान युवा क्रांती संघटना धुळे शाखेमार्फत धुळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुरस्कारसाठी नामांकन अर्ज पाठविण्यासाठी प्रमोद पाटील (९८८११९४८१६) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







