पाडसे येथील घटना, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे वाटणीच्या वादातून चौघांनी मिळून एकास मारहाण करत जखमी केल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत भागवत उत्तम कोळी रा. पाडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची वडिलोपार्जित २४ बीघे जमीन असून त्याची वाटणी झाली नसून वाटणी बाबत चर्चा करण्यासाठी चुलतभाऊ हिलाल लोटन कोळी, मोतीलाल लोटन कोळी ( दोन्ही रा. डांगरी), भरत चैत्राम कोळी (रा. बोरगावले ता. चोपडा) व फिर्यादीचा सख्खा भाऊ गुलाब उत्तम कोळी (रा. पाडसे) हे ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात जमले असताना वाटणी वरून त्यांचा वाद झाला त्यावेळी वरील लोकांनी फिर्यादीस चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवागाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मोतीलाल लोटन कोळी याने मोटरीचा फ्यूज काढून रुमालात बांधून डोक्यावर मारल्याने डोक्यावर जखम झाली आहे. असे फिर्यादीत नमूद केले असून चौघांविरुद्ध फिर्याद मारवड पोलीसात दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024