तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अमळनेर तालुका हिंदी शिक्षक मंडळ, पंचायत समिती (शिक्षण विभाग)अमळनेर व यूनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.
त्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून कु.प्रतिक्षा अरूण पाटील हीने प्रथम क्रमांक पटकावला तर शालेय स्तरावर यश विजय पाटील,माहेश्वरी अशोक पाटील, वैष्णवी कैलास पाटील यांना प्रोत्साहनपर स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक दिपक मुरलीधर पवार, मनोहर प्रकाश देसले, यांना कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्काराने विश्वास हरी पाटील ( गटशिक्षणाधिकारी , अमळनेर ) यांच्या हस्ते काल अमळनेर येथील प.पू.सानेगुरूजी पतपेढी च्या सभागृहात संपन्न समारंभात गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत विद्यालयातून १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्व यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार डॉ.बी.एस.पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024