बास्केटबॉल स्पर्धेत जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक…
अमळनेर:- क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चुरसीच्या लढ्यात सेंट मेरी हायस्कूल च्या १४ वर्ष आतील खेळाडूंनी बाजी मारत रूस्तमजी संघाला हारवून प्रथम क्रमांक पटकावला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे सामना पार पडला. त्यामुळे त्यांनी विभागावर होणाऱ्या सामन्यात प्रवेश मिळविला असून जिल्हाभरामधून आलेल्या अनेक संघामधून सेंट मेरी हायस्कूलच्या मुलींनी सातत्य राखत हा पराक्रम केला. अमळनेर तालुक्यातील मुलींच्या संघाला विभागावर खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. कोच विकी बैसाणे, क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी यांचे या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संघात जान्हवी भामरे, मानसी पाटील, अनुष्का पवार, मेघना मराठे, वैष्णवी पाटील, हर्षाली पाटील, राजश्री गांगुर्डे, श्रेयसी सोये, तन्वी पवार, यज्ञा पाटील, अपूर्वा पाटील, अवंतिका तुंटे इत्यादी मुलींनी सहभाग देऊन उत्तम कामगिरी करून दाखवली. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तालुक्यातून या खेळाडूंवर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.