एड्स दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब व आधार संस्थेकडून कार्यक्रम संपन्न…
अमळनेर:- एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसोबत सुरू असलेला सकस आहार व प्रोटीन किट वाटप कार्यक्रम रोटरी हॉल येथे संपन्न झाला.
सकस आहारासाठी ॲड. राहील रियाज काझी यांनी त्यांचे वडील अमळनेर येथील प्रसिद्ध कायदे तज्ञ रियाज काझी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मदत दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. रियाज काझी व एचआयव्ही ग्रस्त १५ वर्षीय मुलाच्या निधनाबाबत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अभिजीत भांडारकर यांनी केले. ज्यात त्यांनी मुलांना नियमित व वेळेवर औषध घेण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. रोटरी क्लब आणि दातांच्या आभार व्यक्त करताना आधार संस्थेच्या डॉक्टर भारती पाटील यांनी प्रबोधन पर सत्र घेतले. प्रेसिडेंट कीर्ती कुमार कोठारी यांनी देखील मुलांना नियमित गोळ्या घ्या व त्याची नोंदणी ठेवा याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला रोटरी क्लबचे, सेक्रेटरी तहा बुक वाला, ईश्वर सैनानी, दिनेश रेझा, सनी कोठारी, विशाल शर्मा, आधार संस्थेचे कार्यकारी संचालक रेणु प्रसाद, संजय कापडे, अश्विनी भदाणे, मयूर गायकवाड, नंदिनी मैराळे आदींचे सहकार्य लाभले.