
वार्ड क्र.११ मधील अस्वच्छतेबाबत दिले होते निवेदन…
अमळनेर:- शहरातील वार्ड क्र.११ मधील अस्वच्छतेबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची पालिकेने तात्काळ दखल घेत साफसफाई केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

शहरातील वार्ड क्र.११ प्रभाग अ मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना विविध साथीच्या रोगांची लागण होवू शकते म्हणून साफसफाई लवकरात लवकर करून त्याची विल्हेवाट करुन स्वछ वार्ड करावे, अश्या आशयाचे निवेदन मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, उपतालुकाध्यक्ष रवी पाटील, शहर सचिव निलेश भावसार, सुनील पाटील, शिवाजी साळुंखे यांनी प्रशासन अधिकारी जगदीश परमार यांना दिले होते. परमार यांनी दखल घेत तात्काळ कर्मचाऱ्यांद्वारे साफसफाई केली असून पदाधिकारी व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. व नियमित साफसफाई करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.








