
मारवड पोलीसात केली तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे एकास मारहाण झाल्याने त्याने मारवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शत्रुघ्न नगराज कोळी हा दिं. १४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावात जात असताना गावातील ज्ञानेश्वर भिकन कोळी हा हातात लाकडी दांडका घेवून उभा होता. तो दारूच्या नशेत असल्याने त्याने काही एक कारण नसताना फिर्यादीस शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने जाब विचारला असता ज्ञानेश्वर याने लाकडी दांडक्याने डाव्या पायावर व गालावर मारहाण करत जीवे करण्याची धमकी देत शिवीगाळ करू लागला. इतरांनी मध्यस्थी करून फिर्यादीस सोडविले. त्यानंतर मेमो घेवून उपचारानंतर सदर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.







