
वर्णेश्वर मंदिराजवळ अमळनेर पोलिसांची कारवाई…
अमळनेर:- येथील चोपडा रोडलगत असलेल्या वर्णेश्वर मंदिराजवळ गावठी रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या एकास अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पो. नि. विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा रोडलगत असलेल्या वर्णेश्वर मंदिराजवळ अविनाश बाळू शिरसाठ ( वय २६) रा. वाडी बू. ता. शिरपूर यास पकडले असता त्याचे कडून विना परवाना गावठी बनावटीचे सहा बोरचे एक रिव्हॉल्वर, चाकू, फायटर, दोन मोबाईल, असा २७,८०० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे. कॉ. सुनिल पाटील हे करीत आहेत. या कारवाईच्या पथकात पो. नि. विजय शिंदे यांच्यासह हे. कॉ. सुनील हटकर, हे. कॉ. किशोर पाटील, पो.ना. दीपक माळी, पो.ना. रवींद्र पाटील, पो.ना. सिद्धांत सिसोदे यांचा समावेश होता.







